in

Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या पत्नीलाही ‘ईडी’चं समन्स

१०० कोटींच्या वसूली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता बळावली आहे. अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांना ईडीने समन्स बजावले असून त्यांना उद्या(गुरुवार) सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अनिल देशमुख यांचे वकील कमलेश घुमरे यांनी याविषयीची माहिती दिली आहे. सीबीआयने आपल्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द व्हावा यासाठी देशमुख यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरची सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने या याचिकेचा निकाल राखून ठेवला आहे.

मात्र, अद्याप ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे. ईडीने आत्तापर्यंत देशमुख यांच्यासह त्यांचा मुलगा ऋषिकेश, त्यांची पत्नी आरती यांना समन्स बजावलेलं आहे. मात्र त्यांच्यापैकी कोणीही अद्याप चौकशीला सामोरं गेलेलं नाही. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्याची मागणी अनिल देशमुख यांच्या वकिलांनी केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“हे सरकार बलात्काऱ्यांना राजाश्रय देतंय”

Mandira Bedi | पती राज कौशलच्या आठवणीत मंदिरा बेदी भावूक