in ,

ED अविनाश भोसलेंची पुन्हा चौकशी करणार

लोकशाही न्यूज नेटवर्क

रिअल इस्टेट किंग अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित भोसले यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. ‘ईडी’कडून गुरुवारी या दोघांनाही आणखी एक समन्स बजावण्यात आले . आज पुन्हा साधारण चार वाजता या दोघांची एकत्र चौकशी केली जाईल.

परकीय चलन नियमन कायद्यातंर्गत अविनाश भोसले यांनी सहा वर्षांपूर्वी केलेल्या एका व्यवहाराची चौकशी होत आहे. यापूर्वीही ईडीने अविनाश भोसले यांना अनेकदा चौकशीसाठी बोलावले होते. 10 फेब्रुवारीला अंमलबजावणी संचलनालय अर्थात ED ने अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर छापाही टाकला होता. गुरुवारी ईडीने अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले यांनाही चौकशीसाठी पाचारण केले होते. आज पहाटे अमित भोसले यांची साधारण चार तास चौकशी झाल्याचे समजते. त्यानंतर उद्या या पिता-पुत्रांची पुन्हा एकदा चौकशी होईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ज्यांचे डिपॉझिट जप्त होते, त्यांना काय महत्त्व द्यायचे, अजित पवारांचे पडळकरांना प्रत्युत्तर

प्रफुल पटेल यांना ईडीकडून पुन्हा समन्स