in

वीज उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू; उर्जामंत्र्यांची माहिती

कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती कमी झाली असून गरजेनुसार महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांना वीजेचा पुरवठा केला जात आहे. राज्यात कुठेही भारनियमन केले जात नसून वीज उत्पादन वाढविण्यासाठी योग्य नियोजन केले जात आहे, अशी माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली आहे.

राज्यात मागणीच्या तुलनेत ३ हजार मेगावॅट वीजेचे कमतरता जाणवत आहे. ही वीजेची तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी पर्यत्न करीत आहे असे उर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले.

“महावितरणने सुद्धा त्यांची एकूण वीजेची मागणी १८,१२३ मेगावॅट आणि मुंबईसह एकूण मागणी २०,८७० मेगावॅट सायंकाळी पिक डिमांड पूर्ण केले आहे. महानिर्मितीने वीज उत्पादनामध्ये उत्तम समन्वय राखल्याने कोळश्याची आवक वाढली. वीज उत्पादन वाढूनसुद्धा कोळसा साठ्यात सुधारणा आहे. भुसावळ येथे वीज उत्पादन संच सुरु करण्यात आल्याने वीजेमध्ये अधिकची भर पडणार आहे, असे राऊत म्हणाले.

“कोळसा टंचाई असताना देखील भुसावळ येथील २१० मेगावॅट, चंद्रपूर येथील ५०० मेगावॅट, नाशिक येथील २१० मेगवॅट हे संच सध्या बंद आहेत. तसेच नियमित देखभाल दुरुस्तीसाठी तीन संच बंद आहेत. एकूण २७ पैकी सात संच बंद आहेत. कोळसा वाहून नेण्याची कोल इंडियाची क्षमता ४० लाख मेट्रिक टन आहे. पावसामुळे ती २२ लाख मेट्रिक टन इतकी खाली होती. ती आता २७ लाख मेट्रिक टनापर्यंत आलेली आहे. त्यामुळे कोल इंडियाकडून क्षमतेनुसार कोळश्याचा पुरवठा केला जावा यासाठी प्रयत्न करत आहोत,” असे नितीन राऊत म्हणाले,

“सोमवारी ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास विशेष म्हणजे शिखर मागणी (पिक डिमांड) काळात महानिर्मितीने औष्णिक, वायू आणि जल विद्युत केंद्रांतून ८ हजार ११९ मेगावाट इतकी वीज निर्मिती करून कोळश्याच्या कमतरतेच्या काळात सुद्धा राज्याच्या वीज ग्राहकांना पुरेशी वीज उपलब्ध करून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. महावितरणने सुद्धा त्यांची मुंबई वगळता एकूण विजेची मागणी १८ हजार १२३ मेगावाट आणि मुंबईसह एकूण मागणी २० हजार ८७० मेगावाट सायंकाळी ७ च्या शिखर मागणीच्या सुमारास उद्दिष्टपूर्ती केली आहे,” अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रस्त्याच्या कामात गैरप्रकार; ईडीच्या पथकांची चौकशी सुरू

‘लहान मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिनला परवानगी नाही’