in

विजेची तार अंगावर पडल्याने आठ जनावरांचा दुर्दैवी मृत्यू

आदेश वाकळे;संगमनेर | संगमनेर तालुक्यात विजेची तार जनावरांच्या अंगावर पडून आठ जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.असून संबंधित मेंढपाळ कुटुंबातील बंडू केसकर यांनी प्रशासनाकडून भरपाईची मागणी केली आहे.

संगमनेर तालुक्यातील रायते शिवारात वादळी वाऱ्यानी विजेची तार तुटून आठ जनावरांच्या अंगावर पडल्याने जागीच मरण पावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यात सात मेंढ्या व एक शेळी चा समावेश आहे. आठ जनावरांचा मृत्यू झाल्याने बंडु केसकर या मेंढपाळाचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर पंचनामा केला असून पशु वैदकीय यांनी पीएम देखील केला आहे.तसेच सविस्तर अहवाल तहसील कार्यालयात जमा करणार असून प्रशासनाकडून लवकरच नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मेंढपाळ बंडू केसकर आणि ग्रामस्थांनी केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जळगाव पोलीस शिपाई भरती परीक्षेत स्मार्ट कॉपी

सांगलीत तलावात बुडून बहिण-भावाचा दुर्देवी मृत्यु