in

‘माझाही फोन टॅप होतोय,’ माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला संशय

सध्या राज्यात फोन टॅपिंग प्रकरण गाजत आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अशातच भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी देखील आपला फोन टॅप होत असावा, असा संशय व्यक्त केला आहे.

सुमारे पाच वर्षांपूर्वी महसूलमंत्री असताना एकनाथ खडसे आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या कथित संभाषणावरून वाद निर्माण झाला होता. तो थेट उच्च न्यायालयापर्यंत गेला होता. एटीएसने असे कोणतेही संभाषण झाले नसल्याचा निर्वाळा न्यायालयात दिला होता. त्यानंतर पुण्यातील भोसरी जमीन व्यवहारप्रकरणी त्यांना मंत्रीपद सोडावे लागले होते.

मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर माझा फोन टॅप केला जात असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मला सांगितले होते, असा दावा एकनाथ खडसे यांनी आता केला आहे. यासंदर्भात अतिरिक्त मुख्य सचिवांकडे आपण तक्रार देखील केली. त्यावर त्यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले होते. मात्र तेव्हापासून आतापर्यंत माझाही फोन टॅप होत असल्याची शंका एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

विधानसभा निवडणूक : पश्चिम बंगालमध्ये 79.79 तर, आसाममध्ये 72.14 टक्के मतदान

मिशन बिगीन अगेन : राज्यात नवी नियमावली लागू