in

‘ईडी लावलीय तर मी सीडी लावण्याचे काम करणार’,एकनाथ खडसेंचा भाजपला इशारा

लोकशाही न्यूज नेटवर्क | तुम्ही माझ्या मागे ईडी लावली आहे, तर मी सीडी लावण्याचे काम करणार’, असल्याच्या इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपला दिला आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात जाऊन त्यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे भाजप यावर काय प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गुरुवारी जळगाव दौऱ्यावर होते. या दौऱ्यात आयोजित ‘राष्ट्रवादी संवाद यात्रे’ दरम्यान एकनाथ खडसे यांनी भाजपला पुन्हा एकदा ललकारले. खडसे म्हणाले की, “राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर मी माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावेल, असे गंमतीने म्हणालो होतो. त्यावेळी जयंतराव मला म्हणाले होते, तुमच्या मागे ईडी लागली तर…, तेव्हा मी म्हणालो होतो, मग मी सीडी लावेल. आता खरंच माझ्या मागे ईडी लागली आहे. त्यामुळे आता मी सीडी लावण्याचे काम करणार,” असा इशारा खडसेंनी यावेळी दिला.

जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी १० जागा लढवते. येथे पक्ष बळकट करण्यासाठी एकनाथ खडसे यांच्या अनुभवाचा फायदा करून घ्यायला हवा. आपण ताकदीने काम केले तर सहकार क्षेत्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याला जिंकता येतील, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

प्रफुल पटेल यांना ईडीकडून पुन्हा समन्स

राज्याचा अर्थसंकल्प ८ मार्चला – अजित पवार