देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात माहिती दिली. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम या चार राज्यांसह पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशाच्या म्हणजे एकूण पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार आहेत.
बंगालमध्ये 1 लाखांहून अधिक मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहेत. तर एकूण मिळून १८.६ कोरोड मदतनदाता यावेळी मतदान करणार आहेत. 2 मे रोजी पाचही राज्याच्या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. संपूर्ण देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही या पाच राज्यात होणाऱ्या निवडणुकांवर सर्वांचेच लक्ष लागले आहे. पाचही राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
मतदारांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेऊ. कोरोनामुळे नवी आव्हानं आहेत, नियम पाळून प्रक्रिया पूर्ण करू, असे निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी म्हटलं. तसेच, आसाममधील १२६, तामिळनाडू २३४, पश्चिम बंगालमध्ये २९४, केरळ १४० आणि पद्दुचेरीत ३० जागांसाठी विधानसभा निवडणूक होणार आहे.
पुद्दुचेरी, केरळ, तामिळनाडू, या राज्यात 6 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यात मतदान होणार आहे.
पहिला टप्पा २७ मार्च
दुसरा टप्पा 1 एप्रिल
तिसरा टप्पा 6 एप्रिल
चौथा टप्पा 10 एप्रिल
पाचवा टप्पा 17 एप्रिल
सहावा टप्पा २२ एप्रिल
सातवा टप्पा २७ एप्रिल
आठवा टप्पा २९ एप्रिल
आसाम मध्ये ३ टप्प्यात मतदान होणार.
पहिला टप्पा २७ मार्च
दुसरा टप्पा 1 एप्रिल
तिसरा टप्पा 6 एप्रिल
Comments
Loading…