in ,

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकार क्षेत्रातील निवडणूक

पश्चिम महाराष्ट्रातील सहकारातील सर्वात मोठी निवडणूक समजली जाणारी कृष्णा सहकारी साखर कारखन्याच्या निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाले. तिरंगी लढत यावेळी सभासदांच्या नशीबी आली. सत्ताधारी सहकार पँनलने पहिलीच आपली उमेदवारी दाखल करत शड्डू ठोकला होता तर संस्थापक पँनेलचे अविनाश मोहिते व रयत पँनैल चे इंद्रजित मोहीते यांच्यात मनोमिलनाची चर्चा शेवट पर्यंत रंगली होती. अखेर ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मनोमिलनाच्या प्रकियेतून बाहेर पडल्याचे भर पत्रकार परिषदेत जाहीर केले. व तिरंगीचा सामना जाहीर झाला. ही निवडणूक नुसती कारखान्यासाठी नसून येथे महाराष्ट्राच्या राजकारणावर नेहमी राजकीय पकड ठेवणाऱ्या कराडच्या विधानसभेची तालिम ठरते. तसे पाहता जरी निवडणूक बिगर राजकीय असली तरी पँनल प्रमुख हे राजकीय पदाधिकारी आहेत. आता यामध्ये सांगलीकर यांचा चांगलाच कस नेहमीप्रमाणे लागणार आहे. मंत्री जयंत पाटील यांच्या वाळवा मतदार संघात कारखान्याचे बरेच सभासद हे मतदार आहेत. जवळपास १४ हजार सभासद हे इस्लामपूर व वाळवा तालुक्यात आहेत.

परंतु हे सभासद तिन्ही ठिकाणी विभागले असले तरी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांना मानतात. त्यामुळे जयंत पाटील यांच्या डावपेचास अन्यसाधारण महत्व आहे. तर दुसरे मंत्री विश्वजित कदम हे आपले वडील ज्येष्ठ काँग्रेस नेते कै. पतंगराव कदम यांच्या पावलावर पाऊल ठेवत रयत पँनैलला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. आपले वडीलांचे जुने स्नेहसंबंध जपत डॉ. इंद्रजित मोहीते यांना पाठिंबा जाहीर करत प्रचारसभा करताना दिसत आहेत. डॉ. विश्वजित कदम यांच्या पलूस कडेगाव मतदार संघात ३ हजारहून जास्त कृष्णाचे सभासद आहेत. त्यामुळे त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. दुसरीकडे अविनाश मोहीते यांना कै. माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह उंडाळकर यांनी पाठिंबा दर्शिवला आहे. उंडाळकर गट हा देखील कराड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आहे व निर्णायक भूमिका घेऊ शकतो त्यामुळे संस्थापक पँनेल देखील जोरात कामाला लागले आहे. विशेष म्हणजे तिन्ही पँनेल नी कारखान्याची सत्ता भोगली आहे. त्यामुळे सभासद यांची ते नस ओळखून आहेत. आता आश्वासन यांचा पाऊस पडत आहे. परंतु सभासद कोणास सत्ता देईल हे नक्की सांगता येत नाही. सुरुवाती पासून डॉ. सुरेश भोसले यांच्या सहकार पँनेलने आपला जाहिरनामा सभासद यांच्या समोर ठेवत प्रचारात आघाडी घेतली आहे.

सहकारच्या प्रचारात मा.चेअरमन मदनदादा मोहीते यांनी देखील सक्रिय सहभाग घेतला.तर युवा नेते अतुलबाबा भोसले हे देखील नेहमी सक्रीय दिसतात.दुसरीकडे रयत व संस्थापक यांचा वेळ मनोमिलनात गेला. अखेर मनोमिलन न झाल्याने ज्येष्ठ काँंग्रेस नेत्यांची नाराजी ओढविण्याची पाळी येऊन ठेपली. कृष्णाचे ४७,१६० सभासद मतदार पैकी एकट्या कराड दक्षिण मतदार संघातील ५६ गावात २८५०० सभासद मतदार आहेत. त्यामुळे मा.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काय भूमिका घेतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनोमिलन न झाल्याने ते नाराज आहेत. तर कराड उत्तर मतदार संघात १५०० सभासद मतदार आहेत. कराड उत्तर ला पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची भूमिका देखील महत्त्वाची आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सोशल मिडियावर गाव विकासाची चर्चा

Coronavirus : देशात नव्या ६०,७५३ बाधितांची भर