in

Electricity Costs : 1 एप्रिलपासून वीज होणार स्वस्त

देशात इंधन दरवाढ आणि सक्तीच्या वीज देयक वसुलीने हैराण असलेल्या सामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. राज्यातील वीजग्राहकांना दिलासा देणारे निर्देश वीज नियामक आयोगाने दिले आहेत. या निर्देशानुसार १ एप्रिलपासून राज्यातील वीजदर सुमारे २ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नियामक आयोगाने सुनावणी दरम्यान एफएसी (इंधन समायोजन उपकर) फंडाच्या माध्यमातून वीज कंपन्यांना फंडाचा वापर करून ग्राहकांना त्याचा फायदा देण्याचे आदेश दिले आहेत. मार्च २०२० मध्ये या FACच्या माध्यमातून जनतेला दिलासा देण्यास सुरुवात झाली. मार्च २० ते मार्च २१ पर्यंत सर्व रहिवासी, दुकान, कंपनी, उद्योगासाठी १० टक्के वीजदर कमी करण्यात आले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Railway | १० रुपयांच्या प्लॅटफॉर्म तिकीटासाठी आता मोजा ३० रुपये!

मराठा समाजाला आरक्षण द्या, नाही तर…; चंद्रकांत पाटलांचा सरकारला इशारा