in ,

नीरव मोदीला भारताच्या ताब्यात देण्याचा इंग्लडच्या न्यायालयाचा आदेश

पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि हिरे व्यापारी नीरव मोदी आता भारतातील न्यायालयासमोर हजर होणार आहे. ब्रिटनच्या न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावत, त्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. भारतातील न्यायव्यवस्था निष्पक्ष असल्याचा निर्वाळाही न्यायालयाने दिला.

नीरव मोदीला भारतात अऩेक प्रश्नांची उत्तर द्यावी लागणार आहेत. त्याने दिलेल्या जबाबातील अनेक बाबी विसंगत आहेत. भारतात पाठविल्यानंतर त्याला दोषी ठरवली जाण्याची दाट शक्यता असल्याचे वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाचे न्यायमूर्ती सॅम्युअल गोजी यांनी म्हटले आहे. भारताच्या हवाली केल्यानंतर नीरववर अन्याय होईल, अशी परिस्थिती नाही. भारतातील न्यायव्यवस्था निष्पक्ष असल्याचे सांगत न्यायालयाने मानसिक आरोग्याबाबत नीरवने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. तथापि, या निर्णयाविरोधात वरच्या न्यायालयात जाण्याचा पर्याय देखील नीरवसमोर आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वाढत्या कोरोना रुग्णांची चिंता : मुंबईतील ओव्हल मैदान आज सायंकाळपासून बंद

IND vs ENG : भारताची 145 धावापर्यंत मजल, इंग्लंडचे तीन गडी बाद