in

IND vs ENG 3rd Test : इंग्लंडचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय

 इंग्लंड आणि यजमान टीम इंडियात आज तिसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर तिसरा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना गुलाबी चेंडूने दिवस/रात्र खेळला जाणार आहे. जगातील या सर्वात मोठ्या स्टेडियमवर पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाणार आहे. शिवाय, दोन्ही संघ या सामन्यात विजय मिळवण्याच्या निर्धारित असतील.

आजपासून सुरु झालेल्या सामन्यात इंग्लंड कर्णधार जो रूटने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल केले आहेत.

भारतीय संघाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फलंदाजी क्रमात काही बदल केलेला नाही. गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव प्लेइंग इलेव्हनमध्ये परतले आहेत.इंग्लंड संघात प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल केला आहे. जोफ्रा आर्चर आणि जेम्स अँडरसनचा अंतिम-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. भारताविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यात विश्रांती मिळालेल्या जॉनी बेअरस्टोला देखील संघात संधी मिळाली आहे. इंग्लंडकडून जॅक क्रॉली आणि डोम सिब्लीची जोडी सलामीला येईल. वेगवान गोलंदाजी विभागात आर्चर आणि अँडरसनसह स्टुअर्ट ब्रॉडचा देखील समावेश आहे तर जॅक लीच आणि डोम बेस फिरकी विभाग सांभाळतील.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पालघर साधूहत्या प्रकरणातील दुसरे आरोपपत्र सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे राज्य शासनाला आदेश

नाम बडे… : जगातल्या सगळ्यात मोठ्या स्टेडियमला नरेंद्र मोदींचं नाव