in ,

कोरोना काळात कर्मचाऱ्यांना दिलासा, भविष्य निर्वाह निधीचा व्याजदर ‘जैसे थे’

गेल्या आर्थिक वर्षात (2019-20) कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (ईपीएफओ) व्याजदरात कपात करण्यात आल्याने तो 8.5 टक्के झाला होता. कोरोनाच्या कालावधीत यंदा व्याजदरात कपात होण्याची शक्यता होती. मात्र केंद्र सरकारने हा व्याजदर जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ईपीएफओ 6 कोटींहून अधिक सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्‍टीजची बैठक श्रीनगर येथे झाली. त्यात चालू आर्थिक वर्षासाठी (2020-21) व्याजदरात कुठलाही बदल न करता 8.5 टक्केच ठेवण्याचा निर्णय झाला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून त्यावर शिक्कामोर्तब होण्याची औपचारिकता बाकी आहे. त्यानंतर हा निर्णय लागू होईल.

सन 2015-16मध्ये हा व्याजदर 8.80 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला होता. तर, 2016-17मध्ये व्याजदर 8.65 टक्के आणि 2017-18 मध्ये 8.55 टक्के होता. 2018-19मध्ये व्याजदर 8.65 टक्के होता. तथापि, 2019-20मध्ये यात कपात करून व्याजदर 8.50 टक्के करण्यात आला. या 8.50 टक्के व्याजदरापैकी 8.15 टक्के गुंतवणुकीद्वारे आणि 0.35 टक्के समभागातून देण्यात येणार होते.

कोरोना काळात पीएफ रकमेचा आधार
करोना संकट अद्याप टळलेले नाही. पण याच संकट काळात जवळपास दोन कोटी पीएफ सभासदांनी पीएफ फंडातून डिसेंबरपर्यंत 73 हजार कोटींची रक्कम काढली होती. काढले होते. त्यात मार्च अखेर आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वीच्या वर्षात 1 कोटी 63 लाख सभासदांनी पीएफमधून 81200 कोटी काढले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Ind vs Eng 4th Test |पहिल्या दिवसावर भारताचं वर्चस्व, दिवसखेर 1 बाद 24 धावा

संजय राठोडांचा राजीनामा मंजूर