in ,

कोरोनाचा उद्रेक; रुग्णसंख्या 10 हजाराच्या पल्ल्याआड

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतच चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून 10 हजारच्या आकड्याला हुलकावणी देणाऱ्या रुग्णसंख्येने आज तब्बल 10 हजाराच्या पल्ल्याआड रुग्णसंख्या गाठ्ली आहे. त्यामुळे राज्य शासनासह आरोग्य विभागाची चिंता पुन्हा वाढली आहे. तसेच राज्यात येणारी दुसरी लाट तर नाही ना ? असा सवाल उपस्थित होत आहे.

राज्यात आज तब्बल 10 हजार 216 कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 21लाख 98 हजार 399 झाली आहे. आज दिवसभरात एकूण 6 हजार 467 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या 20 लाख 55 ह्जार 951 वर पोहोचली आहे. त्याचवेळी राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 52 हजार 393 इतका झाला आहे.

विशेष म्हणजे राज्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा सातत्याने ९२ ते ९३ टक्क्यांचा आसपास राहिला आहे. ताज्या आकडेवारीच्या आधारावर महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट ९३.५२ टक्के इतका नोंदला गेला आहे.

अ‍ॅक्टिव्ह रुग्णांमध्ये पुणे आघाडीवर

राज्यातल्या एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता अवघी 88 हजार 838 इतकी राहिली आहे. यामध्ये सर्वाधिक 18 हजार 401 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यामध्ये असून मुंबईत 9 हजार 55 रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. नागपूरमध्ये देखील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ११ हजार ५५२ वर पोहोचली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अॅन्टिलिया स्फोटक प्रकरण : पोलिसांवर विश्वास नाही का, अनिल परब यांचा फडणवीसांना सवाल

अॅन्टिलिया स्फोटक प्रकरणात चर्चेत असलेले सचिन वाझे नेमके आहेत कोण?