in

स्फोटक प्रकरण; मुंबई गुन्हे शाखा संपूर्ण प्रकरणाचा तपास करतेय- अनिल देशमुख


प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील ‘अँटिलिया’ इमारतीजवळ स्फोटकांनी भरलेली एक कार सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. तसेच घटनेची माहिती मिळताच सर्वच यंत्रणा कामास लागल्या आहेत.

मुकेश अंबानी यांच्या इमारतीजवळ गुरुवारी संध्याकाळी स्फोटकांनी भरलेली एक कार सापडली. या कारमध्ये जिलेटिन कांड्या होत्या. अल्टामाऊंट रोडवर मुकेश अंबानी यांची भव्य ‘अँटिलिया’ इमारत आहे. अँटिलियापासून जवळच काही अंतरावर एका स्कॉर्पियो कारमध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्या आहेत. वाहतूक पोलिसांनी ही स्कॉर्पियो ताब्यात घेत पुढील तपास सुरु आहे. विशेष म्हणजे या गाडीची नंबर प्लेट बनावट होती. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आहे.या घटनेची माहिती मिळताच अँटिलियाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर आता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे. बॉम्ब निकामी करणारे पथक तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत.

या सर्व प्रकरणावर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराच्या काही अंतरावर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटीन स्फोटकाच्या २० कांड्या सापडल्या आहेत. या घटनेची संपूर्ण चौकशी मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस करीत असून चौकशीतून लवकरच सत्य समोर येईल. असे ते म्हणाले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बापरे; मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या ८ हजारांचा पल्ला सोडेचना!