in

अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकं प्रकरण; तपास एनआयएकडे द्यावा – देवेंद्र फडणवीस

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अ‍ॅन्टिलिया’ निवासस्थानाजवळ काहीच दिवसांपूर्वी जिलेटीनच्या कांड्या सापडल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेवर विधानसभेतही आज चर्चा झाली. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. तसेच या प्रकरणात त्यांनी अनेक शंकाही उपस्थित केल्या आहेत.

अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकं प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली स्फोटक प्रकरणाचा घटनाक्रम संशय निर्माण करणारा आहे. विशेष म्हणजे वाहन सापडल्यावर टेलीग्रामवर एक ग्रुप तयार झाला आणि त्यावर एक पत्र आले ‘जैश उल हिंद‘ नावाने. एक क्रिप्टो करंसी अकाऊंट दिले होते. पण तसे कुठले खातेच नव्हते,” असा देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर खुलासा केला.

धमकीच्या पत्रावरही संशय…दोन गाड्या आल्या

देवेंद्र फडणवीस यांनी धमकीचं पत्रावरही अनेक शंका उपस्थित केल्या. घटनास्थळी एकच गाडी तिथे आली नव्हती, त्या ठिकाणी दोन गाड्या आल्या होत्या. या दोन्ही गाड्या एकाच मार्गाने आल्या असून ठाण्यातूनच आल्या आहेत. गाडी ओळखल्याबरोबर पोलीस अधिकारी सचिन वझे पहिल्यांदा पोहोचले. कोणीही पोहोचण्याआधी ते पोहोचले नंतर क्राइमचे, स्थानिक पोलीस ठाण्याचे आणि इतर लोक आले. नंतर सचिन वझे यांनी तपास अधिकारी म्हणून नेमण्यात आलं. तीन दिवसांपूर्वी एका एसीपीला तपास अधिकारी म्हणून नेमलं असून, सचिन वझेंना का काढलं? हे समजलं नाही”.

फडणवीस पुढे म्हणाले, वझे ठाण्यातील, गाडी ठाण्यातील आणि या दोघांचे आधीपासून संवाद हे खूपच योगायोग असून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. गाडी दिसल्याबरोबर वझे तिथे पोहोचले. धमकीचं पत्रही सचिन वझे यांना प्राप्त झालं. त्यांनीच ते टेलीग्रामवर टाकलं. शंकेला वाव देणारे बरेच पुरावे आहेत. त्यामुळे ही संपूर्ण चौकशी एनआयएला द्यावी, अशी आमची मागणी आहे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

१ एप्रिलपासून वीज दरात २ टक्के कपात होणार

Alert ; राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा चाळीशी पारा जाणार !