कोझिकोड स्टेशनवर चेन्नई-मंगळुरू सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये 117 जिलेटिन स्टिक आणि 350 डिटोनेटर सापडले आहे. चेन्नईतील एका महिलेकडूनही स्फोटकं ताब्यात घेण्यात आली असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान रात्री मुंबईत स्फोटकं सापडल्याने खळबळ उडालेली असतानाच केरळमध्ये आज सकाळी कोझिकोड रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर स्फोटक सापडली आहेत. याप्रकरणी एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या सीट खाली स्फोटकांचा साठा सापडला आहे. ही महिला चेन्नईहून थालास्सेरीकडे जात होती. मात्र, ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेनेच ही स्फोटकं आणली होती का? याबाबतच्या वृत्ताला कुणीही दुजोरा दिलेला नाही. ही स्फोटकं या महिलेने आणली की इतर कुणी तिच्या सीट खाली ठेवली याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस या महिलेची कसून चौकशी करत आहे. चौकशीअंतीच पोलिसांकडून याबाबतची अधिकृत माहिती देण्यात येणार आहे.
Comments
Loading…