in

तारापूर औद्योगिक क्षेत्रात भीषण अग्नितांडव

नमित पाटील | पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीची तीव्रता इतकी जास्त आहे, संपूर्ण परीसरात धुरांचे लोण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या असून युद्धपातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सिनय कंपनीच्या शेजारी भीषण आगीची घटना घडली आहे. या आगीच्या नजीक रस्त्यावर उभ्या असलेल्या केमिकल टँकर व मोकळ्या जागेत असलेले पाईप ही आगीच्या भक्ष्यस्थानी गेले आहेत. या घटनेची तिव्रता इतकी जास्त आहे कि आकाशात धुरांचे लोण पसरले आहेत.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच युद्धपातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शॉर्ट सर्किटने टँकरला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मच्छिमारांच्या जाळ्यात अडकला दुर्मिळ व्हेल मासा, सुटकेच्या थराराचा व्हिडीओ

सोशल मीडियासाठी सहा कोटी खर्च करण्याचा निर्णय अजित पवारांकडून रद्द