in ,

फेसबुकला दणका ; ४,७८३ कोटींची भरपाई द्यावी लागणार

मोबाईलमधील फेस रेकग्निशन फीचर्सचा वापर करून वापरकर्त्यांची माहिती गोळा करणाऱ्या फेसबुकला जोरदार दणका बसला आहे. वापरकर्त्यांचा बायोमेट्रिक डेटा चोरी केल्याचा आरोप सिद्ध झाल्यानं फेसबुकला तब्बल ४ हजार ७८३ कोटी रुपयांची भरपाई द्यावी लागणार आहे.

फेसबुकने नवं फीचर देत वापरकर्त्यांची माहिती गोळा केली आहे. फेशियल रेकग्निशन तंत्राच्या माध्यमातून यामुळे गोपनीयतेचं उल्लंघन झाल्याचा दावा करत डिसेंबरपर्यंत १५ लाख ७१ हजार ६०८ फेसबुक वापरकर्त्यांनी कंपनीविरोधात न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी सामूहिक सुनावणी झाली. फेसबुकनं तक्रारदारांना भरपाई देण्याचा आदेश सॅन फ्रान्सिस्कोच्या न्यायालयानं दिला आहे. फेसबुकला तक्रारदारांना ४ हजार ७८३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागेल. गोपनीयतेचं उल्लंघन म्हणून आतापर्यंत कोणत्याही कंपनीला इतकी मोठी भरपाई द्यावी लागलेली नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भाजप खासदाराचे कोरोनामुळे निधन

धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा प्रवीण दरेकरांची मागणी