in ,

देश-विदेशावर बोलणारे मुख्यमंत्री महाराष्ट्रावर एक वाक्यही बोलले नाहीत, फडणवीसांची टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना विरोधकांबरोबरच मोदी सरकारवर टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशाबरोबरच मुख्यमंत्री अन्य देशांबद्दलही बोलले, पण महाराष्ट्रावर एक वाक्यही बोलले नाहीत.

विधान भवन परिसरात देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. चौकातील भाषण आणि सभागृहातील भाषण यातील अंतर हे मुख्यमंत्र्यांना अद्यापही लक्षात आलेले नाही. पूर्वी ते नवीन होते, पण आता भरपूर दिवस झाले. सरकारने दिलेले राज्यपालांचे भाषण जसे दिशा देणारे नव्हते, तसेच मुख्यमंत्र्यांचे भाषणसुद्धा दिशाहीन होते, असे ते म्हणाले.

कदाचित ते तासभर बोलले, पण या तासाभरात ते महाराष्ट्रात आलेच नाहीत. चीन, पाकिस्तान, अमेरिका, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, काश्मीर आणि अगदी दक्षिणेपर्यंत ते गेले. पण, महाराष्ट्राबाबत मात्र ते एक वाक्यही बोलू शकले नाहीत. बोंडअळी, विमा, वीजतोडणी कशावरही बोलले नाहीत. महाराष्ट्रातील लाखो शेतकर्‍यांची वीज तोडणार्‍या मुख्यमंत्र्यांना सिंधू सीमेवरील शेतकर्‍यांची चिंता आहे, अशी टीका त्यांनी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जळगाव वसतिगृह प्रकरण; तृप्ती घोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशीस सुरूवात

‘खोटं बोल, पण रेटून बोल’ मुख्यमंत्र्यांचे नवे रूप; ‘बंद दारा’च्या मुद्द्यावरून फडणवीसांचा हल्लाबोल