in ,

‘खोटं बोल, पण रेटून बोल’ मुख्यमंत्र्यांचे नवे रूप; ‘बंद दारा’च्या मुद्द्यावरून फडणवीसांचा हल्लाबोल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणात आज (3 मार्च) पुन्हा ‘बंद दारा’चा मुद्दा आला. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘खोटं बोल, पण रेटून बोल’ असे मुख्यमंत्र्यांचे नवे रूप पाहायला मिळाले, असे फडणवीस म्हणाले.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला मुख्यमंत्री ठाकरे यांनी उत्तर दिले. तुम्ही 2014ला आम्हाला फसवले. तेव्हाही आम्ही हिेंदूच होतो. आताही निर्लज्जपणाने बंद दाराच्या आत ठरलेली गोष्ट बाहेर नाकारता. ज्या खोलीत हे ठरले, ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची खोली आमच्यासाठी मंदिर आहे. हेच का तुमचे बाळासाहेबांबद्दलचे प्रेम? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात केला होता.

प्रसार माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी यावरून हल्लाबोल केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे जे काही बोलले ते केवळ उसने अवसान आणून बोलले. सत्य त्यांना ठावूक आहे. त्यावेळी नक्की काय ठरले हे त्यांना माहीत आहे. पण खोटं बोल, पण रेटून बोल’ असे मुख्यमंत्र्यांचे नवे रूप पाहायला मिळाले, अशी टीका त्यांनी केली.

जवानांचा अपमान
शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलताना, चीन समोर आला की पळे, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्याबाबत फडणवीस म्हणाले की, हा भारतीय सैनिकांचा अपमान आहे. ज्या सैनिकांनी उणे 30 डिग्री तापमानात लढाई करून, भारताची एक इंच भूमी चीनला मिळू दिली नाही. चिनी सैनिकांनी माघार घेतली. अशा शूर सैनिकांचा जणू काही ते पळपुटे आहेत, असा अपमान मुख्यमंत्र्यांनी केल्याचा आऱोप फडणवीस यांनी केला.

हे तर जनतेचे समर्पण
राम मंदिराच्या निधी संकलनावर शिवसेनेकडून टीका केली जात आहे. पण, खंडणीखोरांना समर्पणनिधीतील भाव समजणार तरी कसा, असा सवाल फडणवीसांनी केला. लोक पैसा देत असतील तर एवढे वाईट वाटण्याचे कारण काय? ज्यांना खंडणी वसूल करायची सवय असते, त्यांना जनतेचं समर्पण काय आहे? हे समजत नाही, असे फडणवीस म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

देश-विदेशावर बोलणारे मुख्यमंत्री महाराष्ट्रावर एक वाक्यही बोलले नाहीत, फडणवीसांची टीका

साईवास्तु : सुख, शांत आणि समृद्ध आयुष्य जगण्यासाठी… वास्तुशास्त्र