in

संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपाने यावर आक्रमक भूमिका घेत, याप्रकरणी आरोप असलेले वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच, जर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशाराही दिला होता.

या पार्श्वभूमीवर अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत राठोड यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. यावर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“खरं म्हणजे पहिल्याच दिवशी हे सगळं प्रकरण बाहेर आल्यानंतर हा राजीनामा यायला हवा होता. याचं कारण, ज्या प्रकारचे पुरावे या संपूर्ण प्रकरणात आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते इतकं भयानक आहे की अशा परिस्थितीत मंत्रिपदावर राहणं हे पूर्णपणे चूक होतं. राजीनामा तूर्तास आहे की पूर्तास हे आम्हाला माहिती नाही, सरकारचा खरा चेहरा उघड झाला आहे. जो पर्यंत पूजाला अंतिम न्याय मिळत नाही, तोपर्यंत भाजपा याचा पाठपुरावा करेल. असंही यावेळी फडणवीस म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

…तर सर्व भाजपा आमदार राजीनामा देणार

संजय राठोडांना तात्काळ अटक करा – अतुल भातखळकर