in

अंधेरीत बोगस कॉल सेंटर… १०९ मोबाईल, ८३ हार्डडिस्क, तर १० जण ताब्यात

अंधेरीत बोगस कॉल सेंटरवर टाकलेल्या छाप्यात एमआयडीसी पोलिसांनी १४५ जणांवर कारवाई केली आहे. ब्रॉडमाईंड आयटी सोल्यूशन्स या फेक कॉलसेंटरमार्फत अमेरिकन नागरिकांना गंडा घालण्याचा प्रकार सुरू होता. पोलिसांनी याप्रकरणी १० जणांना तत्काळ ताब्यात घेतले असून अन्य १० जण फरार आहेत.

तर, १३५ जणांना आरोपी केल्याची माहिती परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. या कारवाईत पोलिसांनी १०९ मोबाईल फोन्स, ८३ हार्ड डिस्क आणि ४ राऊटर जप्त केले आहेत. तसेच संबंधित प्रकरणात हवालामार्फत पैशांची देवाणघेवाण सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. अद्याप संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून यामध्ये आणखी धागेदोरे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रेमडेसिवीरसाठी ग्लोबल टेंडर… राज्य सरकार ‘अॅक्शन मोड’ मध्ये

Anil Deshmukh | सीबीआयची नागपूरच्या घरात कारवाई… अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या?