in

फॅन्ड्री चित्रपटातील शालू आठविते का? आत्ताचा लुक पाहून थक्क व्हाल

लोकशाही न्यूज नेटवर्क | मराठी चित्रपट सृष्टीला दहा वर्षापूर्वी खूप वाईट दिवस चालू होते. कोणताही चित्रपट व्यवस्थित चालत नसे. परंतु त्यानंतर मराठी चित्रपटाला सोनेरी दिवस येऊ लागले. संजय जाधव, रवि जाधव, नागराज मंजुळे अशा अनेक दिग्दर्शकांनी मराठी चित्रपट सृष्टीत मोठा हातभार लावला. यांच्या अनेक चित्रपटांनी भरभरून यश संपादित करून करोडोचा गल्ला जमविला.

नागराज मंजुळे यांच्या सर्वच चित्रपटांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. त्यांनी काढलेला फॅन्ड्री चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडला. आपल्या सर्वांनाच माहिती आहे नागराज मंजुळे प्रत्येक चित्रपटात नवीन नवीन कलाकारांना संधी देत असतात. त्याप्रमाणेच फॅन्ड्री चित्रपटात देखील अनेक नवीन बालकलाकारांची निवड केली होती. ज्यात शालू नावाचे पात्र साकारणाऱ्या राजेश्वरी खरात हिचा देखील समावेश होता.

फॅन्ड्री चित्रपटातील राजेश्वरीचे सौंदर्य व तिचा अभिनय प्रेक्षकांना खूपच भावला. राजेश्वरी हीच्या सध्याच्या फोटोज् सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतात. तिचा फोटोशूट दरम्यान काढलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

8 एप्रिल 1998 रोजी पुणे येथे जन्मलेल्या राजेश्वरी ला नागराज मंजुळे यांनी चित्रपटात घेतले आणि तिने त्यात यश संपादन केले. चित्रपट यावेळी राजेश्वरी फक्त पंधरा वर्षाची होती सात वर्षानंतर ती आता कशी दिसते हाच प्रश्न प्रेक्षकांना पडला होताती आता पूर्वीपेक्षा आणखीन जास्त सुंदर दिसत आहे. फॅन्ड्री नंतर राजेश्वरीने “आयटमगिरी” हा चित्रपट देखील केला होता. यापुढेही तिला अनेक चित्रपटात आपल्याला पाहायला मिळावे हीच अपेक्षा.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मोदींनी केलेल्या आंदोलनजीवी उल्लेखावर राहुल गांधी म्हणाले…

‘सिद्धी हेट्स शिवा’ पोस्टरने नागरिकांना पडले कोड्यात