in

जर्मनीच्या बर्लिनमध्ये ढोलताशांच्या गजरात बाप्पाला निरोप

उदय चक्रधर, प्रतिनिधी

जर्मनीच्या बर्लिन शहरात गणपती  बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आलाय.  “गणपती बाप्पा मोरया” या जयघोषाने बर्लिन नगरी मधील हरमानप्लाट्झ परिसर दुमदूमून गेला होता.  यावेळी रींगण सोहळाही रंगला. बर्लिन शहरातील  हजारो भारतीय, जर्मन आणि इतर आंतरराष्ट्रीय समुदाय मधील भाविक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जमले होते. यावर्षी, गणेशोत्सवाच्या निमित्ताने जागतिक शांततेसाठी, कोविड नंतरची परिस्थिती लवकरात लवकर सामान्य व्हावी तसेच जर्मनी आणि भारत ह्या दोन्ही देशांची भरभराट व्हावी, ह्या उद्देशाने गणरायाला  साकडे घालण्यात आले. हा कार्यक्रम ‘हासनहायड, बर्लिन’ येथील गणेश मंदिर आणि ‘रमणबाग युवामंच, जर्मनी’ यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. भारत-जर्मनी राजनैतिक संबंधांच्या 70 वर्षे पुर्णत्वाचे कोंदणही ह्या सोहळ्याला होते. या सोहळ्याचा बर्लिन मधील अनेक सरकारी अधिकारी, राजकारणी, बर्लिनमधील भारतीय दूतावासाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रांजणगावच्या महागणपतीला केळीची आरास व फुलांची सजावट

किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात नो एन्ट्री