in

शेतकरी आक्रमक; ‘त्या’ राज्यात भाजपविरोधी मतदान करण्याचे आवाहन करणार

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस आक्रमक होत चालले आहे. त्यात काही राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुलही वाजले आहे. या जाहीर झालेल्या निवडणुकीचा विचार करत आता शेतकरी आंदोलकांनी भाजप विरोधी प्रचार करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे भाजपला विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी चांगलीच मेहनत करावी लागणार आहे.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरीत विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलक सामान्य मतदारांना शेतकरी विरोधी कायदे आणणाऱ्या भाजपला मतदान न करण्याची शिक्षा करणार आहेत, अशी माहिती स्वराज इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी दिली आहे. या आंदोलनाची सुरुवात कोलकत्ता येथून १२ मार्च रोजी होणाऱ्या जाहीर सभेतून होणार आहे.

कुंडली-मानेसर-पलवल एक्सप्रेसवे रोखणार

संयुक्त किसान मोर्चाची बैठक आज पार पडली. या बैठकीत शेतकरी आंदोलना संदर्भातील 15 मार्च पर्यतची रूपरेषा आखण्यात आली आहे. यानुसार 6 मार्च रोजी शेतकरी आंदोलनाला होणाऱ्या 100 व्या दिवशी कुंडली-मानेसर-पलवल एक्सप्रेसवे रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे. सकाळी ११ ते सायंकाळी चार दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी हा एक्सप्रेसवे रोखून धरण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती योगेंद्र यादव यांनी दिली.

शेतकरी-कर्मचारी रस्त्यावर उतरणार

योगेंद्र यादव आंदोलना संदर्भात पुढे म्हणाले आहेत की, 10 प्रमुख कामगार संघटनांसोबत बैठक झाली आहे. या बैठकीतील निर्णयानुसार आता शेतकरी-कामगार एकत्रितपणे ही लढाई लढण्याचा निर्णय झाला आहे.तसेच येत्या 15 मार्च रोजी कामगार आणि कर्मचारी खासगीकरण आणि नगरसेवकांच्या विरोधात देशभर रस्त्यावर उतरतील.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona Virus : महामारीच्या काळातील निधी वाटपात पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप

अर्णब गोस्वामींना हक्कभंग समितीचं समन्स