in ,

शेतकरी बांधवांना खरिपासाठी कर्ज पुरवठा करणार

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कोरोना महामारीचा विचार करता शेतकऱ्यांना शेती कामांमध्ये कोणतीही अडचण येऊ नये याकरीता शासनामार्फत आवश्यक सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती दिली.

छगन भुजबळ म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीसाठी प्राप्त झालेला निधी कर्जमाफीसाठीच वापरण्यात यावा. शेतकऱ्यांनी सहकारी संस्थामार्फत घेतलेल्या कर्जाच्या रकमेची वसुली करण्यासाठी त्यांच्या जमीनींचे लिलाव करण्यासाठी सध्याचे वातावरण अनुकूल नाही. ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची वेळेत परतफेड केली असून त्यांना नव्याने कर्ज घ्यायचे आहे, अशा शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेण्यासाठी बँकाकडून आवश्यक असणारी कागदपत्रे व प्रमाणपत्रे वेळेत उपलब्ध करून देण्यात यावीत. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना वेळेत व सुरळीतपणे कर्ज पुरवठा होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Monsoon | येत्या तीन दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

भाजपाचे आणखी पाच नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार!