in

श्रीराम फक्त तुमचे नाहीत… फारुख अब्दुल्लांनी सुनावलं

लोकशाही न्यूज नेटवर्क

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी मोदी सरकारला शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून धारेवर धरलं. अब्दुल्ला यांनी आक्रमक होत लोकसभेत मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

हा कायदा आहे. कोणताही धर्मग्रंथ नाही, ज्यामध्ये बदल करता येत नाहीत. शेतकऱ्यांशी सरकारने चर्चा करून यावर त्वरित तोडगा काढला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. शेतकरी कायदे रद्द करत अडथळे निर्माण करण्यासाठी आपण नाही, असा युक्तीवाद केला. तसेच त्यांच्याशी चर्चा केल्याने सरकारचं काय नुकसान होणार आहे? अशी विचारणा फारुख अब्दुल्ला यांनी केली.

डॉक्टर कधीही रक्ताच्या बाटलीकडे पाहून हे हिंदूचं आहे, की मुस्लीम व्यक्तीचं असं विचारत नाही. देवाने सर्वांना समान बनवलं आहे. तुम्ही मंदिरात जाता आणि मी मशिदीत, असं फारुख अब्दुल्ला म्हणाले. यावेळी फारुख अब्दुल्ला यांनी प्रभू श्रीराम संपूर्ण जगाचे असल्याचा उल्लेख केला. “राम संपूर्ण जगाचे आहेत. राम आम्हा सर्वांचे आहेत. कुराणदेखील फक्त आमचं नाही”, असं ते म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ

राज्यात 5 लाखांहून अधिक व्यक्तींना कोरोना लस; तिसऱ्या टप्प्यासाठी केंद्राच्या सूचनेची प्रतीक्षा