in

हाथरस पुन्हा हादरले : मुलीची छेड काढणाऱ्यांविरोधात तक्रार करणाऱ्या वडिलांची डोक्यात गोळ्या घालून हत्या

काही महिन्यांपूर्वी घडलेल्या उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणामुळे संपुर्ण भारत हळहळला होता. हे असतानाच आता पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलीची छेड काढणाऱ्यांविरोधात तक्रार करणाऱ्या वडिलांची डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील सासनी क्षेत्रामध्ये असणाऱ्या नौजरपूरमध्ये ही घटना घडली आहे.

एका पित्याने मुलीची छेडछाड केली म्हणून पोलिसांकडे तक्रार केली. तक्रार केली म्हणून 4 लोकांनी मुलीच्या वडिलांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याची घटना घडली आहे. रात्री उशिरा मुलीचे वडील शेतात काम करत असताना त्यावेळी त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. घटनेनंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतू रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव अमरिश असे आहे.

दरम्यान, पोलिसांनकडून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पिडीत मुलीने पोलिसांकडून न्यायाची अपेक्षा केली आहे. संबंधित मुलीचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बापाच्या मृत्युनंतर मुलीने हंबरडा फोडला. डीएसपी रुची गुप्ता या प्रकरणात कारवाई करत आहेत. या सर्व प्रकारामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रशियात दिसल्या रहस्यमयी रेषा, नासाचे वैज्ञानिकसुद्धा झाले हैराण

ICC Player of the Month Award; आयसीसीच्या नामांकनात रविचंद्रन अश्विनचे नाव