in

स्त्रीवादी आयकॉन कमला भसीन यांचे निधन

प्रख्यात स्त्रीवादी लेखिका आणि महिला हक्क कार्यकर्त्या कमला भसीन यांचे आज पहाटे निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. महिला हक्क चळवळीच्या लढ्यात कमला भसीन यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. दक्षिण आशियातील स्त्रीवादी आंदोलनाला पुढे नेण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

कमला भसीन यांचा जन्म २४ एप्रिल १९४६ रोजी झाला होता. एक स्त्रीवादी कार्यकर्ती, कवयित्री, लेखिका अशी त्यांची ओळख होती. भसीन यांनी लिंग सिद्धांत, स्त्रीवाद आणि पितृसत्ता समजून घेण्यावर अनेक पुस्तके लिहिली आहेत, त्यापैकी अनेक ३० पेक्षा जास्त भाषांमध्ये अनुवादित केली गेली आहेत.

काही महिन्यांपूर्वीच कमला भसीन यांना कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. कमला यांच्या क्योंकि मै लडकी हू, मुझे पढना है या कविता विशेष लोकप्रिय होत्या. १९७० च्या दशकापासून कमला भसीन भारतातील तसेच अन्य दक्षिण आशियाई देशांमध्ये महिलांच्या चळवळीतला एक प्रमुख आवाज आहे. २००२ मध्ये त्यांनी स्त्रीवादी नेटवर्क ‘संगत’ ची स्थापना केली, जी ग्रामीण आणि आदिवासी समाजातील वंचित स्त्रियांसोबत काम करते, बहुतेकदा नाटक, गाणी आणि कला यांसारख्या साधनांचा वापर करते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

MPSC पदभरतीवरून पडळकरांचा सरकारवर निशाणा

शस्त्रक्रियेनंतरच्या उपचारासाठी घरीच नजरकैदेत ठेवा, सचिन वाझेची न्यायालयाकडे मागणी