in

परमबीर सिंह यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या मयुरेश राऊतवर गुन्हा दाखल

संदीप गायकवाड | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा आणि पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमीरे यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार करणाऱ्या विरारच्या बांधकाम व्यवसायिक मयुरेश राऊत याच्यावर तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नालासोपारा पूर्वेकडील विजय नगर येथील प्रभाकर भवन ही चार मजली इमारत एम.आर.टी.अंतर्गत बोगस सीसीच्या आधारे उभी करण्यात आली. या चार मजली इमारतीचे बांधकाम करण्यासाठी मयुरेश राउत याने सिडकोची बनावट बांधकाम परवानगी वापरली होती. ती खरी आहे असे भासवून ९२ ग्राहकांना घरं ही विकले. आणि तेथील रहिवाशांची फसवणूक ही केली.

याप्रकरणी टेरेन्स हॅन्ड्रीकीस यांनी पाठपुरावा करुन प्रकरण बाहेर काढलं होत. पालिकेचे अधिकारी अक्षय मोखर यांनी अखेर मेसर्स प्रतिभा इंटरप्रायजेसेच प्रोपायटर मयुरेश राउतवर आणि त्याच्या इतर सहकार्यावर एमआरटीपीआर अंतर्गत भादवी 420,465,467,468,471,34 सह महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम 1966 चे कलम 52,53,54 प्रमाणे फसवणूकीचा गुन्हा तुळींज पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप राउतला अटक केलेली नाही.

दरम्यान तक्रारदार टॅरेन्स याने मयुरेश राउतने आणखीन एक चार मजली इमारत बांधली असून, त्याच्यावरही पालिका कारवाई करण्यास धजावत असल्याचा आरोप केला आहे. तसेच पोलीस ही बिल्डरावर कमी कलम लावून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.

विशेष म्हणजे मयुरेश राउतने माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा आणि पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमीरे यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लहान मुलाला कोरोना होऊन गेला असेल तर २ आठवडे काळजी घ्या

कंकणाकृती सूर्यग्रहणाला भारतीय मुकणार