in

filmfare | पाहा यावर्षी कोणा कोणाला मिळाली ‘ब्लॅक लेडी’

‘फिल्म फेअर’हा भारतीय सिनेसृष्टीतील मनाचा पुरस्कार म्हणून ओळखला जातो. चित्रपटांमधील अफलातून कामगिरीच्याच जोरावर या पुरस्कारावर नाव कोरता येते. नुकताच ६६व्या फिल्मफेअर पुरस्कार २०२१ची घोषणा झाली. यामध्ये बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेते इरफान खानला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. यावर्षीच्या फिल्म फेअरमध्ये थप्पड या चित्रपटाने बाजी मारलेली दिसते.

फिल्म फेअर पुरस्कारातील विजेत्यांची यादी पुढील प्रमाणे :

सर्वोत्कृष्ट चित्रपट- थप्पड
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- ओम राऊत (तान्हाजी द अनसंग वॉरिअर)
सर्वोत्कृष्ट अभिनेता- इरफान खान (अंग्रेजी मिडीयम)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- तापसी पन्नू (थप्पड)
सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफर- फराह खान (दिल बेचारा)
सर्वोत्कृष्ट ड्रेस डिझायनर- विरा कपूर (गुलाबो सिताबो)
सर्वोत्कृष्ट पदार्पण महिला- आलाया फर्निचरवाला (जवानी जानेमन)
सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक- राजेश कृष्णन (लूटकेस)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- सैफ अली खान (तान्हाजी द अनसंग वॉरिअर)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- फारुख जाफर (गुलाबो सीताबो)
सर्वोत्कृष्ट प्लेबॅक गायिका- असीस कौर (मलंग)
सर्वोत्कृष्ट प्लेबॅक गायक- राघव चैतन्य (थप्पड)
सर्वोत्कृष्ट संगीत – प्रतिम (लुडो)

समीक्षक पुरस्कार
सर्वोत्कृष्ट चित्रपट- ऐब आले ऊ
सर्वोत्कृष्ट अभिनेता- अमिताभ बच्चन (गुलाबो सीताबो)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- तिलोटामा शोम (सर)

विशेष पुरस्कार
लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड- इरफान खान
आरडी बर्मन पुरस्कार- गुलजार

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Ind Vs Eng 3rd ODI : इंग्लंडला चौथा धक्का… कर्णधार बटलर तंबूत परत

पंतप्रधान मोदींचा दौरा संपताच बांगलादेशात मंदिरांवर हल्ले; १० जणांचा मृत्यू