in

अनलॉकबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील – अजित पवार

राज्य अनलॉक करण्यासंदर्भात गुरुवारी झालेल्या घोषणेनंतर लॉकडाऊन संदर्भात संभ्रमावस्था निर्माण झाली होती. दरम्यान अनलॉकचा निर्णय आज जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र सरकारमधील सर्वच मंत्र्यांनी अनलॉकबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असाच सूर धरला आहे.

राज्य पाच टप्प्यात अनलॉक करण्याबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी केलेल्या घोषणेच्या काही तासांतच राज्यसरकारने हा निर्णय विचाराधीन असल्याचे परिपत्रक जारी केले. त्यानंतर विरोधकांनी हा मुद्दा उचलून सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते.

उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात ब्लॅक फंगसवरील इंजेक्शनची कमतरता असल्याचे सांगितले. तर राज्यात येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन सज्ज असल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच पुणे- पिंपरी चिंचवडचा पॉझिटिव्हिटी रेट कमी असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान अनलॉकवरून झालेल्या गोंधळावर बोलताना अजित पवार यांनी अनलॉकबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील अशी माहिती दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

”मागच्या सरकारमध्येही सुपरमंत्री होते”, नाना पटोलेंचे फडणविसांना प्रत्युत्तर

लस न घेता घराबाहेर फिराल, तर दंड! औरंगाबाद प्रशासनाचा प्रस्ताव