in

‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’चं ‘विघ्नहर्ता’ गाणं प्रदर्शित’

बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानचा चित्रपट‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’चं‘विघ्नहर्ता’हे गाणं प्रदर्शित झालं आहे. काल या गाण्याचा टीझर शेअर करण्यात आला होता. त्यानंतर गणेशोस्तवाचे औचित्य साधतं विघ्नहर्ता हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

सलमानच्या चित्रपटातील पहिलं गाणं हे विघ्नहर्ता आहे. या गाण्यात अभिनेता वरुण धवन देखील दिसत आहे. सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे गाणं शेअर केलं आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘अंतिमची सुरुवात गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने’, असे कॅप्शन सलमानने दिले आहे. हे गाणं पाहिल्यानंतर प्रेक्षकांना या चित्रपटाची आतुरता लागली आहे.

‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’मध्ये सलमान खान आणि आयुष शर्मा पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती सलमान खान फिल्म्सने केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे.

दरम्यान, सलमान सध्या तुर्कीमध्ये त्याचा आगामी चित्रपट ‘टायगर ३’ च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यानंतर सलमान ‘किक २’, ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तर आमिर खानच्या ‘लाल सिंह चढ्ढा’मध्ये पाहुणा कलाकार म्हणून सलमान हजेरी लावणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

test

रशियात घुमला बाप्पाच्या आरतीचा नाद