मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेला म्हणजेच एनआयए या प्रकरणात विविध खुलासे करत आहेत.त्यात आता मुकेश अंबानीच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटक ठेवणार मास्टरमाईंड कोण आहे ? हे त्वरित पुढे आणावे अशी मागणी राज्याचे ग्रामविकासमंत्री व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
हसन मुश्रीफ म्हणाले, एटीएसने हिरेन मनसुख प्रकरणाचा तपास अंतिम टप्यात आणला असताना हा तपास एनआयएने स्वतः कडे घेतला आहे. यामागे एटीएसने केलेला तपास बिघडवयाचा होता काय अशी शंका उपस्थित केली. तर आता ज्या उत्साहाने एनआयएने तपास आपल्या हाती घेतला आहे, तर तो लवकर पूर्ण करून अंबानीच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर कोणी स्फोटके ठेवली ? याचा मास्टरमाईंड कोण ? हे त्वरित पुढे आणावे अशी मागणी मुश्रीफ यांनी केली.
Comments
Loading…