in

मुंबईतील आजचे पेट्रोलचे दर जाणून घ्या!

इंधनाच्या कच्च्या किंमतीत घट असूनही तेल विपणन कंपन्यांनी आज (शुक्रवार) किंमती वाढवल्या आहेत. आज पेट्रोल २९ आणि डिझेल ३४ पैशांनी महाग झाले आहेत. इंधन तेलाच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने पेट्रोलचे दर दिल्ली आणि मुंबईमध्ये विक्रमी उंचावर आहेत. त्याचबरोबर देशातील बर्‍याच भागात पेट्रोल १०० च्या वर पोहोचले आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ आणि अनुपपूर, राजस्थानमधील श्रीगंगानगर आणि महाराष्ट्रातील परभणी येथे पेट्रोल १०० च्या पुढे आहे.

काय आहे आजचा दर?

  • आजच्या बदलांनंतर दिल्लीत पेट्रोलची किंमत आता प्रतिलिटर ९२.३४ रुपये झाली आहे. त्याचबरोबर डिझेल प्रति लिटर ८२.९५ रुपये झाले आहे.
  • मुंबईत पेट्रोल ९८.६५ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९०.११ रुपये प्रति लिटरला विकले जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल ९४.०९ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८७.८१ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत ९२.४४ रुपये तर डिझेलची किंमत ८५.७९ रुपये प्रतिलिटर झाले आहे.
  • भोपाळमध्ये पेट्रोल १००.३८ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९१.३१ रुपये प्रति लिटरला विकले लखनौमध्येही पेट्रोलचे दर ९० पार झाले आहेत. पेट्रोल .९०. १८ आणि डिझेल ८३. ३३ रुपये प्रति लिटर विकले जात आहे.

तुमच्या शहरातील पेट्रोलचे दर कसे कराल चेक?

देशात तेलाच्या दरांमध्ये दररोज सकाळी ६ वाजता सुधारित केले जातात. कारण देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. हे नवीन दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी ६ वाजेपासून लागू आहेत.

आपल्या फोनवरून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे आपण जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइल एसएमएस सेवेअंतर्गत आपण ९२२४९९२२४९ या मोबाइल क्रमांकावर एसएमएस पाठवू शकता. आपला एसएमएस असा असेल, RSP <स्पेस> पेट्रोल पंप डीलर कोड.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

…आता मास्क घालण्याची आवश्यकता नाही, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची मोठी घोषणा

Corona | देशात 24 तासांत 3.43 लाख रुग्ण; 4000 मृत्यू