in

कपिल शर्माच्या विरोधात मध्यप्रदेशमध्ये एफआयआर दाखल

सोनी टीव्हीवर येणारा ‘द कपिल शर्मा शो’ खूपच लोकप्रिय आहे. कपिल शर्मा आणि त्याची टीम आपल्या विनोदांनी लोकांना हसवण्याचे काम करतात. मात्र या शो मध्ये दाखवण्यात आलेल्या एका दृश्यामुळे तो अडचणीत आला आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये न्यायालयाचा सेट उभारण्यात आला होता. यात कपिल शर्मा हातात दारुचा ग्लास घेऊन आपले पात्र साकारत होता. यामुळे न्यायालयाचा अपमान झाल्याची तक्रार त्याच्याविरोधात दाखल करण्यात आली आहे. मध्यप्रदेशमधील शिवपुरी येथील एका वकिलाने कपिल शर्मा याच्याविरोधात सीजीएम कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणावर 1 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

सोनी टीव्हीवरुन प्रसारित होणारा कपिल शर्मा शो खूपच गचाळ आहे. या शोमध्ये ते महिलांबाबतही अश्लील टिप्पणी करत असतात. एका एपिसोडममध्ये स्टेजवर न्यायालय उभारण्यात आले होते आणि कलाकार दारु पिताना दाखवण्यात आले होते. हा न्यायालयाचा अवमान आहे. त्यामुळे कलम 356/3 अंतर्गत दोषींवर एफआआर नोंदवण्याची मागणी केली आहे, असे तक्रारदार वकिलाने म्हटले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Poco C4 स्मार्टफोन भारतात या तारखेला होणार लॉन्च

Tata in Defense Sector: टाटांनी टाकले संरक्षणक्षेत्रात पाऊल