in

मालेगावच्या सेंट्रल चित्रपटगृहात फोडले फटाके

मालेगाव शहराताल सेंट्रल चित्रपटगृहात सलमान खान याचा ‘करण अर्जुन’ चित्रपट सुरु असतांना त्याच्या चाहत्यांनी थेट चित्रपट गृहात फटाके फोडल्याची घटना दहा दिवसांपूर्वी घडली होती. फटाके फोडण्याचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्याने फटाके फोडणाऱ्या विरोधात चित्रपटगृह मालकाने पोलिसात गुन्हा दाखल केला.

मालेगाव मध्ये सलमान खान, शाहरुख खान, अमिताभ बच्चन अशा हिंदी अभिनेत्यांचे मोठे चाहते आहेत. त्यांचा नविन चित्रपट आला की त्याचे चाहते चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत असतात.आणि त्याची पडद्यावर एन्ट्री होताच काही उत्साही चाहते मात्र थेट फटाके फोडून आनंद व्यक्त करीत असतात. यापुर्वी सलमान खानच्या ट्युबलाईट हा सिनेमा प्रर्दशित झाल्यानंतर फटाके फोडण्याचा असाच प्रकार घडला होता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

…तर उद्धव ठाकरे आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत – संजय राऊत

आता गडचिरोलीत गोंडी भाषेतून शिक्षण..राज्यातील पहिलीच शाळा!