पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरू झालं आहे. आसाममध्ये 47 जागांसाठी मतदान होत आहे. नागरिकांनी मतदानासाठी केंद्राबाहेर गर्दी केली. देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. आज पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये 30 आणि आसाममध्ये 47 जागांसाठी आज मतदान होत आहे. बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये अटीतटीचा सामना होणार आहे, तर आसाममध्ये भाजपासमोर सत्ता टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे.
आसाममध्ये भाजपा पहिल्या टप्प्यातील 47 पैकी 39 जागा लढवत आहे, तर उर्वरित जागांवर आसाम गण परिषद 10 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर दोन जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.
आसाममध्ये काँग्रेसने एआययूडीएफ, बोडोलँड पीपल्स फ्रंट, सीपीआय, सीपीआय (एम), सीपीआय (एमएल), राजद आणि अंचलिक गण मोर्चा या सर्वांसोबत युती केली आहे. हे पक्ष 43 जागा लढवणार आहेत. तर मतदारांसाठी भाजपा आणि काँग्रेस महागठबंधन वगळता तिसरा पर्यायही आहे. मतदारांसाठी तिसरा पर्याय म्हणजे नवख्या आसाम राष्ट्रीय परिषद (एजेपी), गेल्या वर्षी अखिल आसाम विद्यार्थी संघटना आणि आसाम राष्ट्रीय चतुर युवा परिषद परिषदेने याची स्थापना केली होती.
Comments
Loading…