in

समीर वानखेडेंनी लाच मागितल्याच्या आरोपावर पत्नी क्रांती रेडकरची पहिली प्रतिक्रिया

अंमली पदार्थ विरोधी पथकाने क्रूझवर छापा टाकला. या प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना अटक करण्यात आली. मात्र याच प्रकरणात आता आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणातील पंचाने अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (NCB ) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.


या आरोपानंतर मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर म्हणजेच समीर वानखेडे यांची पत्नी ही चांगलीत चर्चेत आली आहे. या सर्व प्रकरणावर तीने नुकतेच “जेव्हा तुम्ही लाटेच्या विरुद्ध दिशेने पोहता, तेव्हा तुम्ही बुडू शकता. पण जर तुम्ही सर्वात शक्तिशाली असाल तर मात्र जगातील कोणतीही लाट तुम्हाला बुडवू शकत नाही. कारण सत्य हे फक्त त्याला माहिती आहे. शुभ सकाळ, सत्यमेव जयते,” असे ट्वीट क्रांतीने केलं आहे.

What do you think?

-4 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Bigg Boss Marathi 3; बिग बॉस च्या घरात संतोष चौधरी (दादूस) यांचं अपहरण

नवाब मलिकांनी शेअर केला समीर वानखेडेंचा जुना फोटो?