in ,

Flight Fare Hike | हवाई प्रवास होणार महाग, विमान इंधनाच्या किंमतीत वाढ

Air India planes are pictured at Indira Gandhi International Airport in New Delhi on September 10, 2018. (Photo by Sajjad HUSSAIN / AFP) (Photo credit should read SAJJAD HUSSAIN/AFP via Getty Images)

देशात कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या महागाईनंतर आता आणखी एक महागाईचा झटका विमानप्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना बसणार आहे. हवाई मार्गाने प्रवास करण्यासाठी प्रवाश्यांना अधिक पैसे मोजावे लागणार आहे. कारण एटीएफच्या किंमतीत अचानक वाढ झाल्याने विमान कंपन्या त्यांच्या भाड्यांच्या किंमती वाढवणार असल्याचे सांगितले जात आहे.

तेल मार्केटिंग कंपनी IOC ने दिल्ली क्षेत्रातील एटीएफच्या किंमतीत 3.6 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. दरम्यान, जागतिक बाजारातही कच्च्या तेलाच्या किंमती वेगाने वाढल्या आहेत, त्याचा थेट परिणाम एटीएफवर देखील झाल्याचे सांगितले जात आहे.दिल्लीतील एटीएफची किंमत 3.6 टक्क्यांनी वाढून, प्रतिलीटर 68,262 रुपये, कोलकातामध्ये 3.27 टक्क्यांनी वाढून 72,295 रुपये आणि मुंबईत 3.77 टक्क्यांनी, 66,482 रुपये झाली आहे. या वाढीसह, एटीएफच्या किंमती 6 महिन्यांत जवळजवळ 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत, असे एटीएफ वाढविण्याबाबत आयओसीने सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, एटीएफच्या किंमतींमध्ये आणखी वाढ होऊ शकते. यावर तज्ज्ञांचे मत आहे की, एटीएफची अशीच वाढ होत राहिल्यास एअरलाईन्स तिकिटांच्या किंमती वाढवू शकतात. दिल्ली विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येबाबत ते म्हणाले की लॉकडाऊन व प्रवासावरील इतर निर्बंधांमुळे विमानाने प्रवास करणार्‍यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

तामिळनाडूत ६९% आरक्षण आहे तर मग महाराष्ट्रात ५०% पेक्षा जास्त का नाही?

Yami Gautam ED | नववधू अभिनेत्री यामी गौतमला ED चे समन्स