in

गोंदिया जिल्ह्यात 96 गावांना पुराचा धोका

गोंदिया जिल्ह्यात  मान्सून कालावधीत  96 पूरप्रवण गावांना पुराचा धोका आहे. मागील वर्षी 2020 मध्ये आलेल्या पुराची पुनरावृत्ती होऊ नये. तसेच धरण, जलाशय इत्यादी ठिकाणी यावर्षी पाण्याचा साठा जास्त असल्यामुळे सर्व संबंधित विभागांनी मान्सूनपूर्व तयारीचे सुक्ष्म नियोजन करण्यासाठी कटंगी जलाशय गोरेगाव येथे एसआरडीएफकडून माकड्रील करण्यात आली.

यावेळी घरगुती टाकाऊ वस्तुपासून तयार करण्यात आलेल्या साहित्यांपासून फ्लोटींग डिवाईस तयार करुन पाण्यात त्यांचे प्रयोग दाखविले. रंगीत तालिमेकरि सर्व प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. पाण्यात रबर बोट व इंजिनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. शोध व बचाव करताना पाण्यात बुडालेल्या व्यक्तीचे शोधकार्य, पाण्याच्या प्रवाहात बोटीचे प्रयोग इत्यादीबाबत प्रात्यक्षिकाद्वारे प्रयोग करुन दाखविण्यात आले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘संजय राऊतांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का?’

Mumbai Rain : पहिल्याच पावसात मुंबई मनपाचा दावा फोल; जनजीवन विस्कळीत