in

धुळे : जयंत पाटलांच्या सभेत कार्यकर्त्यांचा ‘राडा’

लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील व्यंकटेश लॉन्स येथे सुरू असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दोन गटांमध्ये वाद झाला. यानंतर तुंबळ हाणामारी झाल्याचे दिसले. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांचे कार्यकर्ते भूषण पाटलांच्या भाषणादरम्यान जिल्हा परिषदेचे माजी सभापती किरण पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी वाद घातला.

यामुळे अनिल गोटे आणि किरण पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समोरच वाद सुरू झाला. दरम्यान या वादामुळे धुळे शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दोन गट पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचत भांडणं मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

CoronaVirus : राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 35 हजारापेक्षा कमी

सही घेण्यासाठी ‘ते’ मातोश्रीवर… राणे आणि राऊत आमने-सामने