in

वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत अहानचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने सर्वांची मन जिंकणारा अभिनेत्यामध्ये सुनील शेट्टीचा समावेश होतो. मशहूर सुनीलला ऍक्शन आणि कॉमेडी चित्रपटासाठी ओळखला जातो. आता त्याच्या पावलांवर पाऊल टाकत त्याचा मुलगा अहान शेट्टीने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. चित्रपट निर्माते साजिद नाडियाडवाला यांच्या बॅनरखाली बनलेल्या ‘तडप’या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अशातच नुकतेच निर्मात्यांनी या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित केला आहे. टिझरसोबतच या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शित करण्याची तारीखही सांगितली आहे.

‘तडप’चित्रपटाचा टिझर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत असून या चित्रपटात अहान शेट्टीसोबत अभिनेत्री तारा सुतारिया रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या एका टिझरमध्ये ताराचा सुंदर अंदाज पाहायला मिळत आहे. तसेच दुसऱ्या टिझरमध्ये सुनील शेट्टीचा लाडका लेक अहान दमदार अंदाजात दिसत आहे. टिझरमध्ये अहान शेट्टीला पाहून असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की, तो देखील आपल्या वडिलांप्रमाणेच ऍक्शन मोडमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणार आहे.सुनिल् शेट्टी यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाचा टिझर शेअर केला आहे. हा चित्रपट देशभरात ३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘तडप’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलन लुथरिया यांनी केले असून या चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला आहेत. तारा ‘तडप’ या चित्रपटाव्यतिरिक्त ‘हिरोपंती २’मध्येही झळकणार आहे. ताराने आपल्या कारकिर्दीची सुरुवात करण जोहर निर्मित ‘स्टुडंट ऑफ द इयर २’मधून केली होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही असे असले, तरीही ताराच्या अभिनयाला चांगलीच पसंती मिळाली. ताराने ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ नंतर ‘मरजावां’ या चित्रपटात काम केले होते. यामध्ये तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत होता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पबजीचा न्यू स्टेट हा नवीन गेम ‘या’ दिवशी भारतात होणार लाँच

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचं फेसबुक पेज हॅक