in

क्षुल्लक कारणावरून खुपसला पोटात सुरा… मित्र पोटातल्या आतड्या सावरत निघाला

मित्रानेच मित्राच्या पोटात सुरा भोकसुन गंभीर जखमी केल्याचं धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. त्या नंतर पोटातील आतड्या सावरत चालणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल, झाला होता. दरम्यान आता त्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पद्मबहादूर थकोला याच्या गावात राहणारा इंद्रमोहन भारमले बुडा हा ठाण्यात आला होता. तो काल दुपारी पद्मबहादूर याच्या घरी आला. त्याने पद्मबहादूरला आपल्या घरात राहायला द्यावे, आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करावी असे सांगितले. पण पद्मबहादूरने या गोष्टीस नकार दिला. यावरुन दोघांमध्ये मोठा वाद झाला. घरात राहण्यास नकार दिल्याने मित्रानेच मित्राच्या पोटात भोसकला सुरा. आणि उपचारादरम्यान पद्यबहादुर थकोला याचा मृत्यु झाला. आरोपी इंद्रमोहन भारमले बुडावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आले असून, तर आरोपी इंद्रमोहन याच्यावर कलम ३०७ नुसार ठाणे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे सांगितले आहे. ठाणे न्यायालयाने सुनावली २७ तारखेपर्यंतची पोलीस कोठडी.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona | राज्यात १ हजार ७८१ जण कोरोनामुक्त

लातूर जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला धक्का; सर्व उमेदवारांचे अर्ज बाद