in

वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा


पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अखेर शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.

संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी दुजोरा दिला आहे. या प्रकरणावर आता अतुल भातखळकर यांनी ट्वीट केले आहे. ठाकरे सरकारचे तोंड काळे झाल्यानंतर संजय राठोड (गब्रू चा ) राजीनामा दिला आहे. तसेच महाराष्ट्राच्या जनतेची जराही चाड असेल तर आता तरी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांना अटक करावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

संजय राठोड यांनी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटीसाठी वेळ मागितली होती, पण त्यांनी ती नाकारली होती. त्यामुळे संजय राठोड राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यातच मुख्यमंत्री वेळ न देत असल्यानेच राठोड वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.

दरम्यान पोहरादेवी महतांनी राठोड यांच्या राजीनाम्याला विरोध दर्शवला आहे. पोहरादेवी मंदिराच्या महंत जितेंद्र महाराज यांनी विरोध केला आहे. तसंच, संजय राठोड यांचा राजीनामा घेतला तर आमदारकीचा राजीनामा देण्यास भाग पाडू असा इशाराही दिला आहे. महंत जितेंद्र महाराज यांनी ई-मेलद्वारे ही विनंती केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

संजय राठोड ‘वर्षा’ बंगल्यावर; राजीनामा देण्याच्या तयारीत ?

…तर सर्व भाजपा आमदार राजीनामा देणार