in

दोषींवर कठोर कारवाई करा, वनरक्षक-वनपाल संघटनेचे मंत्री यशोमती ठाकूर यांना पत्र

अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट येथील आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी महाराष्ट्र महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटना आक्रमक झाली आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी या संघटनेने महिला व बालकल्याणमंत्री तसेच अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे केली आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यानाअंतर्गत येणाऱ्या हरीसाल वनपरिक्षेत्रातील आरएफओ दीपाली चव्हाण यांना ‘लेडी सिंघम’ म्हणून ओळखले जायचे. त्यांनी काल सायंकाळी आपल्या शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांना सुसाईड नोट मिळाली असून अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी त्यात म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटनेने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना पत्र दिले आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची केली मागणी करण्याबरोबरच सर्व शासकीय कार्यालयांत महिला कर्मचारी व अधिकारी वर्गांसाठी तक्रारनिवारण समिती गठीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. या पत्राच्या अनुषंगाने यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना पत्र पाठवून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Bhandup Hospital Fire; दोषींवर कठोर कारवाई करणार – मुख्यमंत्री

लस घेतली पण फोटो काढण्याची नौटंकी करत नाही – अजित पवार