in ,

Soli Sorabjee | माजी ॲटर्नी जनरल सोली सोराबजी यांचे कोरोनामुळे निधन

देशाचे माजी अ‍ॅटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांचे आज निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी लढत होते. सोली सोराबजी १९८९-९० आणि १९९८ ते २००४ असे दोनवेळा अ‍ॅटॉर्नी जनरल होते.

सोली सोराबजी यांचा जन्म १९३० मध्ये मुंबईमध्ये झाला होता. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये (तेव्हाचे बॉम्बे हाय कोर्ट) १९५३ मध्ये वकीली सुरु केली होती. १९७१ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे वरीष्ठ वकील बनले. ते मानवाधिकारांसाठीचे वकील म्हणून ओळखले जात होते. १९९७ मद्ये युएनने त्यांची नायजेरियामध्ये नियुक्ती केली होती. 1998 ते 2004 पर्यंत ते मानवाधिकार प्रोत्साहन व संरक्षण या विषयावर यूएन-सब कमिशनचे सदस्य आणि नंतर अध्यक्ष बनले. त्यांनी हेग येथे 2000 ते 2006 पर्यंत कायमस्वरुपी लवाद लवादाचे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona | भारताच्या मदतीसाठी अमेरिका तत्पर

Corona Update | 24 तासांत साडेतीन हजार जणांनी गमावले प्राण