in

अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची मतदारांना मारहाण

अंबरनाथमधील कॉंग्रेसच्या माजी सुरेंद्र यादव असं या काँग्रेसच्या माजी नगरसेवकाचं नाव असून तो आधीपासून गुंड प्रवृत्तीचा म्हणून ओळखला जातो. मागील निवडणुकीतही तडीपार असतानाही तो निवडून आला होता. अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुका लवकरच लागण्याची शक्यता असून त्यादृष्टीने प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्या होत्या. या यादीत अनेक नावं एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेली होती.

याबाबत मतदारांनी हरकती घेतल्या असून पालिकेच्या वतीनं प्रभागात जाऊन पडताळणी करण्याचं काम सुरू आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या प्रभाग क्रमांक ८ मध्ये राहणाऱ्या लक्ष्मण यादव यांचं नाव प्रभाग क्रमांक ९ मध्ये गेल्यानं त्यांनीही अशाचप्रकारची हरकत घेतली होती. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांना ते याबाबतची माहिती देत असतानाच या भागाचे माजी नगरसेवक सुरेंद्र यादव आणि त्याच्या मुलाने लक्ष्मण यादव आणि बिरव यादव या दोघांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात दोघांनाही दुखावत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करत सुरेंद्र यादव आणि त्याच्या मुलाला अटक केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुढील दहा दिवस मुंबई शहरासाठी करो या मरो; कोरोना टास्क फोर्स

‘वनमंत्र्यांच्या मागे वाघ’; पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार