in

घणसोलीसाठी झटणारा नेता हरपला, दीपक पाटील यांचं निधन

लोकशाही न्यूज नेटवर्क | घणसोलीचे माजी नगरसेवक, कॉंग्रेसचे उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते दीपक दगडू पाटील यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा व मुलगी, दोन भाऊ, बहिणी असा मोठा परिवार आहे. त्यांच्या या निधनाने राजकीय वर्तुळात शोक व्यक्त होत असून घणसोलीसाठी झटणारा नेता हरपल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

दीपक पाटील यांना मंगळवारी सायंकाळी छातीत दुखू लागल्याने त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृतीने साथ न दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.दरम्यान दीपक पाटील राजकीय कारकीर्द ही खूप गाजली. जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी ते कायम लढत असायचे.

राजकीय कारकीर्द

  • नवी मुंबई महापालिकेच्या 1995 मध्ये झालेल्या पहिल्याच निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून आले होते.
  • 1995 आणि 2000 असे सलग दोन वेळा ते निवडून आले होते.
  • महापालिकेच्या इतिहासात वाढीव मालमत्ता कराविरोधात पहिलेच आंदोलन त्यांनी केले होते.
  • आरोग्य समितीचे सभापती म्हणून गोर-गरीबांसाठी त्यांनी अनेक योजनांचा फायदा मिळवून दिला.
  • आरोग्य विभागातील अनागोंदी कारभाराविरोधात त्यांनी महासभेत आवाज उठवून अनेक प्रकरणे उजेडात आणली.
  • 2010 मध्ये त्यांच्या पत्नी शोभा पाटील नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या.
  • घणसोली गावातील वीजेच्या समस्यांसंदर्भात उर्जामंत्री नितीन राऊत, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या मार्फत गेल्या 15 दिवसापूर्वी महावितरणच्या भांडूप विभागाने पाहणी दौरा केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वर्सोवा आग दुर्घटना; बेकायदेशीर सिलिंडर साठवल्याप्रकरणी एकाला अटक

कोरेगाव भीमाप्रकरणी बनावट पुरावे वापरून मानवाधिकार कार्यकर्त्यांना अटक; ‘वॉशिंग्टन पोस्ट’चा खळबळजनक खुलासा