in

पाकिस्तानच्या ‘या’ दिग्गज खेळाडूला कोरोनाची लागण

Pakistan's players celebrate after the dismissal of Australia's Mitchell Marsh (not pictured) during the ICC men’s Twenty20 World Cup semi-final match between Australia and Pakistan at the Dubai International Cricket Stadium in Dubai on November 11, 2021. (Photo by Aamir QURESHI / AFP)

पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला कोरोनाची लागण झाली आहे. आमिरने स्वत: ट्वीट करून माहिती दिली.तो उद्यापासून सुरू होणाऱ्या टी-१० लीगमध्ये भाग घेणार होता, पण कोरोनामुळे तो या मोठ्या स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही.

पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला कोरोनाची लागण झाली आहे. मोहम्मद आमिरने ट्वीटमध्ये म्हटले, ”माझा सर्वांना नमस्कार! मी या वर्षी टी-१० लीग खेळणार नाही, एवढेच सांगायचे होते. कारण मला करोनाची लागण झाली आहे. पण आता मी ठीक आहे. लवकर बरे होण्यासाठी तुमच्या सर्वांच्या प्रार्थनांची गरज आहे.”

मोहम्मद आमिर अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे तो जगभरात चालणाऱ्या विविध फॉरमॅटच्या लीगमध्ये सहभागी होत आहे. अबुधाबी येथे होणाऱ्या आगामी टी-१० लीगमध्ये तो भाग घेऊ शकणार नाही. आमिरने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, परंतु पाकिस्तान संघाचे व्यवस्थापन बदलल्यानंतर त्याने पुन्हा पुनरागमनासाठी होकार दिला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ST workers strike |…तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना सेवेत घेण्याच्या पर्यायाचा विचार -अनिल परब

हिरव्या मिरचीच्या दरात वाढ; शेतकरी समाधानी